कलाकार विभाग

नियमावली

    व्यावसायिक कलाकार विभागाचे प्रदर्शन मुंबई येथे आयोजित केले जाणार आहे. त्या संदर्भातील माहितीपत्रक या पत्रासोबत जोडले असून प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज कला संचालनालयाच्या https://doa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.०४.११.२०२४ पासून उपलब्ध करुन देण्यात येतील.

  • 2. प्रदर्शनाच्या प्रवेशिका दि.०४.११.२०२४ ते दि.१४.११.२०२४ या कालावधीत https://doa.maharashtra. gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात स्विकारल्या जातील.
  • 3. ऑनलाईन इमेज साईज संदर्भात:- डिजीटल इमेज ही जेपीईजी (JPEG) मध्ये असावी. त्याची साईज किमान 2100 पीक्सेल लांबी / रुंदी (आडवी बाजू किंवा उभी बाजू). 2500 पिक्सेलच्या वर साईज नसावी.उदा. ऑनलाईन इमेज 5 X 7 इंच व 300 डीपीआय (DPI) असेल तर ती 1500 पीक्सेल X 2100 पिक्सेल होईल.
  • 4. फाईल फॉरमॅट :- ईमेज ही जेपीईजी (JPEG) मध्येच असावी. ईमेज फाईलचे नाव पुढील प्रमाणे असावे, कलाकाराचे नाव_ विभाग_ कलाकृतीचे शिर्षक_कलाकृतीचे माध्यम_कलाकृतीची किंमत उदा: Ashok-Kadam_Painting_Landscape_Water Colour_29000.jpg
  • 5. कलाकारांनी ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर करतांना अधिवासाबाबतचा (Domicite Certificate) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला अपलोड करणे आवश्‍यक आहे. अन्यथा कलाकृती बाद केल्या जातील .
  • 6. ऑनलाईन डिजीटल इमेजेस वरुन प्रदर्शनाकरिता कलाकृतींची निवड केली जाईल. प्रदर्शनाकरिता निवडण्यात आलेल्या कलाकृतीची यादी उक्त संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल.
  • 7. प्रदर्शना करिता निवड झालेल्या मुळ कलाकृती स्वीकारण्याच्या तारखा व ठिकाण उक्त संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. प्रदर्शनाकरीता निवड झालेल्या कलाकृती या संचालनालयास प्रत्यक्ष स्वरुपात प्राप्त झाल्यानंतर त्यातून पारितोषिकाकरीता कलाकृतींची निवड करण्यात येईल. पारितोषिक पात्र कलाकारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
  • 8. सदर तारखात काही बदल झाल्यास तसे https://doa.maharashtra. gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी..
  • 9.वरील प्रक्रियेबाबत अद्ययावत सूचना वेळोवेळी उक्त संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. तरी संबंधितांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती प्राप्त करुन घ्यावी.

मदत कक्ष:     +91 9284381041