विद्यार्थी विभाग

नियमावली

    उपरोक्त विषय संदर्भानुसार महाराष्ट्र राज्यातील शासकीय व शासनमान्य अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला संस्थामध्ये अध्ययन करणाऱया विद्यार्थ्यांच्या कलाकृती विद्यार्थी विभागाच्या प्रदर्शनाच्या प्रवेशिका दि.११/११/२०२४ ते दि.२२/११/२०२४ या कालावधीत https://doa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात स्विकारल्या जातील. तरी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्याच्या कलाकृती निर्देशित तारखांना सादर करण्याची व्यवस्था संबंधित संस्थेच्या अधिष्ठाता / प्राचार्य यांनी करावी.

  • 2. ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व संस्थेच्या ई-मेल आयडीवर संबंधित संस्थेचा युजर आयडी व पासवर्ड पाठविण्यात आलेले आहे. त्यानुसार संबंधित संस्थेचे अधिष्ठाता / प्राचार्य यांनी https://doa.maharashtra. gov.in/ या संकेतस्थळावर त्यांच्या संस्थेचा रजिस्टर आयडी व पासवर्ड याचा वापर करुन प्रथम आपल्या संस्थेचा पासवर्ड बदलण्यात यावा व त्यानुसार सदर रजिस्टर आयडीवरुनच आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलाकृतीविषयक माहिती भरावी. ज्या संस्थेना युजरआयडी व पासवर्ड मिळाला नाही त्यांनी 9284381041 या दुरध्वनी नंबरवर संपर्क साधवा.
  • 3.ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या कलाकृती सादर करतांना संबंधित संस्थेचे अधिष्ठाता / प्राचार्य यांनी विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे त्याच अभ्यासक्रमाच्या विभागात संबंधित विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
  • 4. ऑनलाईन इमेज साईज संदर्भात:- डिजीटल इमेज ही जेपीईजी (JPEG) मध्ये असावी. त्याची साईज किमान 2100 पीक्सेल लांबी / रुंदी (आडवी बाजू किंवा उभी बाजू). 2500 पिक्सेलच्या वर साईज नसावी. उदा. ऑनलाईन इमेज 5 X 7 इंच व 300 डीपीआय (DPI) असेल तर ती 1500 पीक्सेल X 2100 पिक्सेल होईल.
  • 5.फाईल फॉरमॅट:- ईमेज ही जेपीईजी (JPEG) मध्येच असावी. ईमेज फाईलचे नाव पुढील प्रमाणे असावे, विद्यार्थ्याचे नाव_ विभाग_ कलाकृतीचे शिर्षक_कलाकृतीचे माध्यम_कलाकृतीची किंमत उदा: Kailas Raut_Painting_Landscape_Water Colour_20000.jpg
  • 6. ऑनलाईन डिजीटल इमेजेस वरुन प्रदर्शनाकरिता कलाकृतींची निवड केली जाईल. प्रदर्शनाकरिता निवडण्यात आलेल्या कलाकृतीची यादी उक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • 7. प्रदर्शनाकरिता निवड झालेल्या कलाकृती स्वीकारण्याच्या तारखा व ठिकाण उक्त संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. प्रर्शनाकरीता निवड झालेल्या कलाकृती या संचालनालयास प्राप्त झाल्यानंतर त्यातून पारितोषिकाकरीता कलाकृतींची निवड करण्यात येईल. पारितोषिक पात्र कलाकारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
  • 8. सदर तारखात काही बदल झाल्यास तसे https://doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • वरील प्रक्रियेबाबत अद्ययावत सूचना वेळोवेळी उक्त संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. तरी संबंधितांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती प्राप्त करुन घ्यावी.

मदत कक्ष:     +91 9284381041